कुख्यात गुंड सतीश भोसले तथा ‘खोक्या’ला प्रयागराजमधून अटक !

प्रतिकात्मक चित्र

बीड – बीड पोलिसांनी कुख्यात गुंड सतीश भोसले तथा ‘खोक्या’ला प्रयागराजमधून (उत्तरप्रदेश) अटक केली आहे. सतीश भोसले हा गुन्हा नोंद झाल्यापासून पसार होता आणि त्याच्याकडे पोलिसांचे लक्ष होते. त्याच्यावर एकूण ३ गुन्हे नोंद असून त्यातील २ शिरूर आणि चकलांबा पोलीस ठाण्यात, तर तिसरा गुन्हा वन विभागाने नोंद केला आहे. त्याला लवकरच बीडला आणले जाईल, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पत्रकारांना दिली.

सतीश भोसले याच्या घरी वन विभाग आणि पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत त्याच्याकडून ६०० ग्रॅम गांजा जप्त केला होता, तसेच घरातून प्राण्यांचे मांसही जप्त करण्यात आले होते. वन विभागाच्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात ‘एन्.डी.पी.एस्.’ कायद्याच्या कलम २० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.