भ्रष्टाचाऱ्यांना अटक न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करू ! – हिंदु जनजागृती समिती

अहवालानुसार दानपेटी लिलावात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांचा घोटाळा झाला असून, त्यात लिलाव करणारे (लिलावदार) ९ जण, ५ तहसीलदार, १ लेखापरीक्षक, १ धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर दोषी म्हणून ठपका ठेवण्यात आला आहे. यांसह त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.

सर्व हिंदू संघटित झाल्यास ईश्वरी राज्य येईल ! – पू. भागिरथी महाराज, संस्थापक अध्यक्ष, गुरुकृपा सेवाश्रम

हिंदूंच्या संघटनाअभावी हिंदूंवर आघात होत आहेत. त्यामुळे जेव्हा सर्व जण हिंदू म्हणून संघटित होतील, तेव्हाच ईश्वरी राज्य येईल, असे प्रतिपादन बेलतरोडीच्या गुरुकृपा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पू. भागिरथी महाराज यांनी केले.

सावरकर म्हणजे शौर्य, धाडस आणि तत्त्वनिष्ठता ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राणांचे बलीदान दिले त्यांचे मोठे योगदान आहेच; पण ज्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी प्रार्थना केली, त्यांचेही योगदान आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते.

ईश्वरी अधिष्ठान ठेवून हिंदु राष्ट्राचे कार्य करा ! – पू. संतोषकुमार महाराज

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंवर होणारे आघात आणि हिंदु राष्ट्राचे होणारे लाभ लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. आता परिस्थिती अनुकूल आहे. आता नाहीतर कधीच नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्याग करावा लागणार आहे.

पुणे जिल्ह्यात हिंदूसंघटन करण्याचा हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि धर्मप्रेमी यांचा निश्चय !

यामध्ये अधिवक्ता, विविध संप्रदायांचे संत, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि वारकरी संप्रदाय यांच्या भेटी घेण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले. या दौर्‍याला येथील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर धर्मशास्त्रविसंगत रासायनिक लेपन नको ! – हिंदु जनजागृती समिती

पंढरपूर येथील श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीची होत असलेली झीज थांबवण्यासाठी पुन्हा एकदा वज्रलेपाच्या नावे रासायनिक लेपन करण्यात येणार आहे. मंदिर आणि त्यातील सर्व विधी हे धर्माशी संबंधित असल्याने तेथील प्रत्येक विधी हा धर्मशास्त्र सुसंगत होणे क्रमप्राप्त आहे.

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि धर्मपालनाचा अभाव यांमुळे भारताची दु:स्थिती ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

समृद्ध आणि उज्ज्वल परंपरा लाभलेल्या भारताची दु:स्थिती होण्याचे कारण म्हणजे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण अन् धर्मपालनाचा अभाव !

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

‘सामर्थ्य आहे चळवळेंचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार आध्यात्मिक साधनेला महत्त्व देऊन या हिंदु राष्ट्राच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सदगुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

मिटकरी यांच्यात अजानची टिंगल करण्याचे धारिष्ट्य आहे का ? – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कुणीही उठावे आणि हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा करावी, हे आता सहन केले जाणार नाही. या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

नगर येथे हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांचे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान पार पडले !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता, धर्मप्रेमी यांनी केला हिंदुराष्ट्रासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !