
मुंबई – ‘पीओपी’ (प्लास्टर ऑफ पॅरिस) पर्यावरणाला घातक आहे, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, तसेच याविषयी शासनाने कधीही संशोधन केले नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पीओपी खरेच घातक आहे का ? याविषयी अभ्यास केलेला नाही. त्यामुळे पीओपी घातक असल्याचे सिद्ध होईपर्यंत मूर्तीकार आणि कारखाने यांच्यावर कारवाई करू नये, अशी भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घोषित केली. पीओपीवरील बंदी हटवण्यासाठी येत्या २० मार्च या दिवशी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. परळ येथील मूर्तीकारांच्या संमेलनात त्यांना पाठिंबा देतांना शेलार बोलत होते.
हिंदूंच्या सणाच्या विरोधातील कट
अनेक वर्षांची ही परंपरा कधीही झुकू देणार नाही. सणांसाठी अनुमती, कारखान्यांच्या जागेसाठी अनुमती, न्यायालयात याचिका, शाडूच्या मातीची सक्ती या सर्व हिंदूंच्या सणांविरोधातील कट आहे. पीओपी पर्यावरणपूरक आहे; मात्र कोणत्याही यंत्रणेने याचा अभ्यास केला नाही. कोणताही वैज्ञानिक पुरावा नसतांना पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचे कारण काय ? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानेही पीओपी विषारी असल्याचा दावा केलेला नाही. गुजरात सरकारने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे साहाय्य घेऊन उच्च न्यायालयाकडून अनुमती मिळवली आहे, असे शेलार या वेळी म्हणाले.
संपादकीय भूमिका :
|