अलीगड (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठणाला बंदी घातल्याने मशिदींच्या गच्चीवर नमाजपठण

जर हे अलीगडमध्ये शक्य झाले, तर देशात ज्या ठिकाणी रस्त्यावर नमाजपठण केले जाते, त्या प्रत्येक ठिकाणी हे झाले पाहिजे ! आता केंद्र आणि प्रत्येक राज्य सरकारांनी यासाठी प्रयत्न करायला हवेत अन् सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास दूर करायला हवा !

अलीगड (उत्तर प्रदेश) में जिलाधिकारी के आदेश के बाद सडक पर नहीं, मस्जिदों के छत पर नमाज पढी गई !

पूरे देश में ऐसा होना चाहिए !

अलीगडमध्ये शक्य होते, तर संपूर्ण देशातही होईल !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील जिल्हाधिकार्‍यांनी रस्त्यावर नमाजपठण, आरती आदी धार्मिक कृती करण्यावर बंदी घातल्यानंतर शुक्रवार, २ ऑगस्ट या दिवशी येथील रस्त्यांऐवजी मशिदींच्या गच्चीवर नमाजपठण करण्यात आले.

अलीगडमध्ये बकरी ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाजपठण झाले, तर आम्ही रस्त्यावर हनुमान चालिसा पठण करू ! – हिंदु महासभेची चेतावणी

बकरी ईदच्या दिवशी जर रस्त्यावर नमाजपठण करण्यात आले आणि जिल्हाधिकारी ते रोखू शकले नाहीत, तर आम्हीही रस्त्यावर हनुमान चालिसाचे पठण करू आणि ते कोणीही रोखू शकणार नाही. – अखिल भारत हिंदु महासभेचे राज्य प्रवक्ते अशोक पांडेय

मशिदींमध्ये महिलांना प्रवेश न मिळण्याच्या सूत्राशी तुमचा संबंध नसल्याने अशी मागणी प्रथम मुसलमान महिलांनी करावी ! – सर्वोच्च न्यायालय

‘शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी याचिका करण्यात आलेल्या संस्थेचा अध्यक्ष मुसलमान होता, ते कसे चालले ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात आल्यास आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘सनातन, हिंदु महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दहा तोंडांचे रावण !’

श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्‍या पक्षासमवेत राहून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना रावणाची उपमा देऊन सौ. विद्या चव्हाण यांनी स्वतःची हिंदुद्वेषी मानसिकता उघड केली आहे. यापूर्वीही सौ. चव्हाण यांनी अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर वारंवार गरळओक केली आहे.

सूरत (गुजरात) येथे पंडित नथुराम गोडसे यांची जयंती साजरी केल्यामुळे हिंदु महासभेच्या ६ कार्यकर्त्यांना अटक

येथील लिंबायतमधील हनुमान मंदिरामध्ये २० मे या दिवशी पंडित नथुराम गोडसे यांची जयंती साजरी केल्याच्या प्रकरणी हिंदु महासभेच्या ८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

अखिल भारत हिंदु महासभा नथुराम गोडसे यांच्याशी प्रामाणिक राहील ! – अखिल भारत हिंदु महासभा

अखिल भारत हिंदु महासभा स्वातंत्र्यपूर्व काळापासून जहाल पक्ष म्हणून राजकीय पटलावर आहे. पूर्वजांंनी केलेले कृत्य आम्ही नाकारू शकत नाही; मात्र कोणी जर नथुराम गोडसे यांना राजकीय ढाल बनवून स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान अव्हेरत असेल, तर ते सहन केले जाणार नाही.

हिंदु महासभेकडून अभिनेते कमल हसन यांना ठार मारण्याची धमकी

आता हिंदु महासभेवर बंदी घालण्याची मागणी केली जाईल; मात्र ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा. १०० कोटी हिंदूंना संपवतो’, असे म्हणणारे अकबरुद्धीन ओवैसी यांच्या एम्आयएम् पक्षावर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही !

भाजप हिंदुत्वनिष्ठ पक्ष नाही ! – मालेगाव स्फोटाच्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी

योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनवणे ही भाजपची आवश्यकता होती. भाजप स्वतःची पोळी भाजून घेत आहे. भाजप देश नाही, तर केवळ पक्ष चालवत आहे. त्याने पक्ष हा व्यापार बनवला आहे. भाजपने देशाला सोडून दिले आहे. देशाला देव चालवत आहे. – सुधाकर चतुर्वेदी


Multi Language |Offline reading | PDF