साधकांवर प्रीती करून त्यांच्याकडून व्यष्टी साधना आणि समष्टी साधना करवून घेणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

सद्गुरु स्वातीताईंनी कोल्हापूर सेवाकेंद्रामध्ये गणेशपूजन केले. तेव्हा सेवाकेंद्रातील वातावरण अतिशय आनंदी आणि चैतन्यदायी झाले होते. तेव्हा मला सद्गुरु स्वातीताईंमध्ये साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन झाले. 

कुडाळ सेवाकेंद्रातून सेवेनिमित्त बाहेर जातांना वानराच्या रूपात मारुतिरायांचे झालेले दर्शन !

आमची चारचाकी गाडी सेवाकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ होती. आम्ही संपर्काला निघत होतो. तेवढ्यात एक वानर गाडीच्या छतावर येऊन बसले. आम्ही याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी ‘‘तुम्हाला मारुतिरायाने दर्शन दिले’’, असे सांगितले. 

मंदिरांच्या संदर्भातील ‘नॅरेटिव्ह’ पसरवणार्‍यांची मते वेळीच खोडून काढली पाहिजेत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांतील २०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग..

भाजपचे आमदार अतुल भोसले यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

या वेळी आमदार भोसले म्हणाले की, धर्मशिक्षणाच्या माध्यमातून भक्तांना मंदिरांशी जोडणे, हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. मंदिरे स्वच्छ ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे.

पुणे येथे ‘राधा-राणी पाणपोई’चे सद्गुरु आणि संत यांच्या शुभहस्ते उद्घाटन !

काळेपडळ येथील श्री राधाकृष्ण मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० मार्च या दिवशी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

साधकांवर मातृवत प्रीती करून त्यांना घडवणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये  !

सद्गुरु स्वातीताई उत्तरदायी साधकांकडून प्रसारातील साधकांचे प्रयत्न समजून घेतात. त्या पुष्कळ तळमळीने आणि चांगले प्रयत्न करणार्‍या साधकांना आवर्जून प्रसाद देतात. सद्गुरु स्वातीताईंकडून मिळालेल्या प्रसादामुळे साधकांचा उत्साह द्विगुणित होतो आणि साधक अधिक उत्साहाने सेवा करतात.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा ‘वंदनीय रमाबाई रानडे’ पुरस्काराने गौरव !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘वंदनीय रमाबाई रानडे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पुणे सार्वजनिक सभा, पुणे’च्या १५५ व्या वर्धापनदिनानिमित्त २ एप्रिल या दिवशी रामेश्वर मार्केट, विजय मारुति चौक येथील सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘रमाबाई रानडे’ पुरस्कार घोषित !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘पुणे सार्वजनिक सभा’ यांच्याकडून ‘रमाबाई रानडे’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेणार्‍या कै. ग.वा. जोशी यांनी ‘पुणे सार्वजनिक सभा’ ही संस्था स्थापन केली आहे.

हिंदूंची मंदिरे सरकारच्या जोखडातून मुक्त करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनो, धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवणार्‍या मंदिर संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी संघटित व्हा !

Kolhapur Fight For Chhatrapati Shivaji Maharaj University : ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.