विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रशासनाला निवेदन
कोल्हापूर, ९ जानेवारी (वार्ता.) – प्रशासनाने ५ जानेवारीपासून विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला आहे; मात्र काही धर्मीय आणि अन्य संघटनांच्या मागणीमुळे हा आदेश काढण्यात आला आहे का ? तरी गडावर जे पर्यटक जातात, ते अन्य हेतूने जात नाहीत ना, हे पहाण्यासाठी त्यांचे आधारकार्ड पडताळण्यात यावे, त्यांच्या पूर्ण नोंदी ठेवाव्यात, गडावर गेलेले सर्वजण खाली येतात का ? हे पडताळण्याची व्यवस्था करावी यांसह प्रशासनाने अन्य उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. या प्रसंगी ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, ‘शांतीदूत मर्दानी आखाड्या’चे श्री. सूरज केसकर आणि श्री. दत्ताजय जाधव, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा संयोजक श्री. प्रमोद सावंत, हिंदू एकता आंदोलन शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, श्री. कैलास दीक्षित, श्री. शरद माळी, श्री. सुनील सामंत, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. आनंदराव पवळ यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विशाळगडावर येणार्या पर्यटकांच्या नोंदी योग्य प्रकारे होण्यासाठी ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवण्याची सूचना
विशाळगडावरील अतिक्रमण, तसेच प्रशासनाने काढलेला आदेश या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली. या प्रसंगी श्री. क्षीरसागर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना विशाळगडावर येणार्या पर्यटकांच्या नोंदी योग्य प्रकारे होण्यासाठी ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवण्यात यावेत, उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी समयमर्यादा ठेवाव्यात यांसह अन्य सूचना केल्या.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.