कोकण आणि महाराष्ट्र यांच्या विकासासाठी महायुतीला विजयी करा !

लोकसभेत महाविकास आघाडीला कोकणात एकही जागा मिळाली नाही. तीच स्थिती या निवडणुकीत असेल. कोकणसह महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित सभेत केले.

मालवण येथे अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटकातील ‘हायस्पीड ट्रॉलर’ला २५ लाख रुपयांचा दंड

तारकर्ली येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटक राज्यातील अतीजलद यांत्रिक नौकेवर (हायस्पीड ट्रॉलरवर) कारवाई करून नौकेच्या मालकाकडून २५ लाख ८७ सहस्र ५२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती येथील मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

दोडामार्ग तालुक्याचा आरोग्य सेवेचा प्रश्न खरच सुटला आहे का ?

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आरोग्य सेवेसारख्या मूलभूत सुविधेसाठी जनतेला आवाज उठवावा लागतो, हे दुर्दैव !

मालवण शहरातील अनधिकृत फळविक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

एस्.टी. बसस्थानकाजवळ फळविक्रेत्याकडून घडलेल्या प्रकारामुळे फळविक्रेत्यांविषयीची नागरिकांची विश्वासार्हता अल्प झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न उद्भवला आहे. फळविक्रेते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर हातगाडी लावून फळे विकतात.

विधानसभा निवडणूक २०२४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघांत १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ मतदारसंघांतून ४ नोव्हेंबर या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण ४ जणांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

मुसलमान समाज नितेश राणे यांना या निवडणुकीत चोख उत्तर देईल ! – नवाज खानी, अपक्ष उमेदवार

भाजपचे आमदार नितेश राणे मुसलमान समाजाच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करत असल्याचा आरोप

मालपे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात ८ वर्षीय मुलगा गंभीर घायाळ

मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण होणार्‍या अशा गंभीर समस्यांवर प्रशासन वेळीच उपाययोजना का काढत नाही ?

दोडामार्ग शहरात पोलिसांनी मारहाण केल्याचा युवकांचा आरोप : पोलीस निरीक्षकांनी आरोप फेटाळला

शहर बाजारपेठेत ३० ऑक्टोबरच्या रात्री शीतपेय आणण्यासाठी गेलेल्या युवकांपैकी एका युवकाला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी थोबाडीत मारले आणि नंतर पोलीस ठाण्यात नेऊन अमानुष मारहाण केली.

कसई (सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरीदेवी मंदिर परिसरातील अन्य धर्मियाचा कक्ष काढायला हिंदुत्वनिष्ठांनी भाग पाडले

कसई येथील श्री सातेरीदेवी मंदिर परिसरात एका मुसलमानाने ‘न्यू देहली स्पेशल गोबी मंच्युरियन’, असा फलक लावून खाद्यपदार्थाचा कक्ष (स्टॉल) चालू केल्याचे समजल्यानंतर येथील जागृत हिंदूंनी संघटित होऊन कक्ष हटवण्यास भाग पाडले.