Places Of Worship Act : ‘पूजा स्थळ कायदा १९९१’ रहित करण्याविषयी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
‘पूजा स्थळ कायदा १९९१’ (प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१) या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करतांना न्यायालयाने केंद्र सरकारला ४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.