मुंबई – होळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावल्यास, अश्लील हावभाव केल्यास, तसेच अनोळखी व्यक्तींवर रंगांचे फुगे फेकल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी मुंबई पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याविषयीची नियमावली प्रसारित केली आहे.
जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य न करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. यासह १२ ते १८ मार्च या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पादचार्यांवर पाणी अथवा रंग फेकणार्यांवर कारवाई केली जाईल, अशी चेतावणीही देण्यात आली आहे.