दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक ! – वीरश्रीचे प्रतीक : गडदुर्ग

प्रसिद्धी दिनांक : १४.५.२०२२ ! विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

राजगडावर (जिल्हा संभाजीनगर) ७ दरवाजांना नवी झळाळी; सहस्रोंच्या उपस्थितीत प्रवेशद्वारांचे लोकार्पण !

छत्रपती शिवरायांचा राजमार्ग असलेल्या पाली मार्गावरील २ प्रवेशद्वारे, गुंजवणे या मार्गाने येणार्‍या चोर मार्गांवरील ३ प्रवेशद्वारे, संजीवनी माची प्रवेशद्वार आणि बालेकिल्ला अशी प्रवेशद्वारे आहेत.

‘राजा शिवछत्रपती परिवारा’कडून पालघर येथील भवानगडाची स्वच्छता !

गडदुर्गांच्या स्वच्छतेचा शिवप्रेमींचा अभिनंदनीय उपक्रम !

‘विजयदुर्ग’ आणि ‘लोकमान्य टिळकांचे स्मारक’ यांचे संवर्धन व्हावे ! 

अशी मागणी का करावी लागते ? खरे तर शासनानेच गड आणि स्मारके यांचे संवर्धन स्वत:हून करायला हवे ?

मंदिरे, गड-दुर्ग आणि स्मारके यांचे जतन आणि संवर्धन शास्त्रोक्त अन् कालबद्धरित्या करण्यात यावे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मंदिरे, गड-दुर्ग आणि संरक्षित स्मारके यांचे काम करतांना त्यांचे मूळ रूप, स्थानमाहात्म्य अन् इतिहास हे लक्षात घेऊन केले जावे.

‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’ कोल्हापूर प्रांताच्या वतीने विशाळगडावरील वाघजाईदेवीच्या मंदिर जिर्णाेद्धाराचे काम !

आम्हा सर्वांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर आम्हा सर्व शिवप्रेमींची असलेली निष्ठा. या निष्ठेपोटीच लोकवर्गणीतून आम्ही हे काम उभे केले.

गडांवरील अतिक्रमणे हटवून ते पूर्ववत् न केल्यास प्रशासनाला जनआक्रोशास सामोरे जावे लागेल ! – रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे ९ वे वंशज

पुरातत्व विभागाने अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात खटले प्रविष्ट करून अतिक्रमणे काढावीत आणि किल्ला पूर्ववत् स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे.

गडदुर्गांचे पावित्र्य जपा !

आपण आपल्या शिवरायांच्या गडदुर्गांविषयी किती प्रमाणात जागृत असायला हवे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. चांगले आदर्श नेहमी समोर ठेवून गडदुर्गच काय, तर आपला देशही स्वच्छ ठेवणे, हे आपले दायित्व आहे, हे ओळखून त्यासाठी प्रयत्नरत रहायला हवे.

गडकिल्ल्यांवरील मद्यपान आणि अस्वच्छता यांच्या विरोधातील ‘पोस्ट’मध्ये इतिहासाचा विपर्यास !

या पोस्टमध्ये प्लास्टिकचा कचरा आणि मद्याच्या बाटल्या यांना अफझलखान आणि शाहिस्तेखान यांच्या रूपात प्रतिकात्मक दाखवून ‘स्वराज्याचा खरा शत्रू अफझलखान नव्हे; तर प्लास्टिकची घाण’, ‘स्वराज्याचा खरा शत्रू शाहिस्तेखान नव्हे; तर दारुड्यांची घाण’, असे लिहिण्यात आले आहे.

‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’च्या वतीने पन्हाळगडावरील तटबंदी आणि बुरुज यांची स्वच्छता !

‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’ गेल्या ३० वर्षांपासून इतिहासाच्या क्षेत्रात दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. ‘शिवराष्ट्र’चे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मोहिमेचे महत्त्व विशद केले. मोहीम प्रमुख राजेंद्र पोवार यांनी ‘संवर्धन मोहिमे’विषयी मार्गदर्शन केले.