अखिलेश यादव यांना झालेला स्वप्नदृष्टांत !

‘गेल्या ५ वर्षांत अखिलेश यादव यांना कधीही स्वप्नदृष्टांत झाला नाही आणि अचानक निवडणुकीच्या तोंडावरच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नात कसा आला ? ’, असा प्रश्न निश्चितच सामान्यांच्या मनात उपस्थित होत असणार !

हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्‍या धर्मांध गुंडाला समाजवादी पक्षाने दिली उमेदवारी !

ज्या राजकीय पक्षाने वर्ष १९९० मध्ये अयोध्येतील शेकडो राममंदिरासाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंची निर्घृण हत्या केली, त्याच्याकडून असे हिंदुद्रोही कृत्य केले जाणे, यात काय आश्‍चर्य !

(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्ण प्रतिदिन माझ्या स्वप्नात येऊन सांगतात की, उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष रामराज्य स्थापन करील !’

वर्ष १९९१ मध्ये कारसेवकांना गोळ्या घालून ठार करून त्यांचे शव दगड बांधून शरयू नदीमध्ये फेकणारा, तसेच बाबरचे वंशज असणार्‍या धर्मांधांना खुश करणारा समाजवादी पक्ष कधीतरी रामराज्य स्थापन करू शकेल का ?

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे नेते आणि उद्योगपती पियूष जैन यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी संपत्ती जमा केली जात होती, तोपर्यंत आयकर विभाग आणि अन्य सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? देशात असे किती नागरिक असणार ज्यांनी अशा प्रकारे बेहिशोबी संपत्ती जमा केली आहे ! त्यांच्यावर कधी कारवाई होणार ?

(म्हणे) ‘आम्ही ४० कोटी आहोत, आम्हाला दुर्बल समजू नका !’

अशी धमकी देऊन बर्क हिंदूंना घाबरवू पहात आहेत, हे पहाता उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !

समाजवाद्यांचा (अपना) बाजार आणि त्यामुळे त्यांची झालेली हानी !

सामाजिक आणि नैसर्गिक शास्त्रात सतत सुधारणा अन् पुनरुज्जीवन होत असते. ‘आपला विचार त्याला अपवाद आहे’, असा समाजवाद्यांना अपसमज असावा.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून साधू-संतांचा ‘चिलिमजीवी’ असा संतापजनक उल्लेख !

हिंदूंच्या साधूसंतांचा असा अवमान केल्याच्या प्रकरणी अखिलेश यादव यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक करायला हवी होती !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा माहिरा खान यांना गोतस्करीच्या प्रकरणी ७ वर्षांनी अटक !

गोहत्येचे समर्थन करणारे काँग्रेसमधील धर्मांध नेते गोहत्या आणि गोतस्करीच करणार, यात आश्‍चर्य ते काय ? अशा काँग्रेसला हिंदूंनी निवडणुकीत धडा शिकवूनही जाग आलेली नाही, त्यामुळे तिला राजकीयदृष्ट्या संपवणेच योग्य !

(म्हणे) ‘महंमद अली जीना हे स्वातंत्र्यलढ्याचे नायक होते !’ – अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष

मुसलमानांच्या मतांसाठी देशाच्या फाळणीला आणि त्यानंतर झालेल्या १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असलेल्या जिनांचा असा उदोउदो करणार्‍या अखिलेश यादव यांना सरकारने कारागृहात टाकून त्यांच्या पक्षावर बंदी घातली पाहिजे !

(म्हणे) ‘हिंदूंनो, मर्यादेत रहा, अखिलेश यादवला (निवडून) येऊ द्या, सर्व आत (कारागृहात) जाल !’

‘तुमच्या स्त्रिया आमच्या ‘हरम’चा (जनानखान्याचा) भाग होत्या, दासी होत्या !’, असेही आक्षेपार्ह आणि वासनांध विधान !