हेमंत करकरे यांचा अपमान केला नाही ! – साध्वी प्रज्ञासिंह यांचे निवडणूक आयोगाच्या नोटिसीला उत्तर

मी तत्कालीन काँग्रेस सरकारकडून मला देण्यात आलेल्या यातनांचा उल्लेख केला होता. माझ्यासमवेत त्या वेळी जे झाले ते जनतेसमोर ठेवणे हा माझा अधिकार आहे. माझ्या वक्तव्याला माध्यमांनी मोडून-तोडून सादर केले आहे. जनभावनेचा सन्मान करतांना मी माझे विधान मागे घेतले होते.

साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद यांचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही ! – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद हे कटकारस्थाने करण्यासाठी एकत्र जमत होते, हे खोटे आहे आणि दोन न्यायालयांनी हे स्पष्ट केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या शापाने कोणाला मरतांना पाहिलेले नाही ! – माजी सरकारी अधिवक्त्या रोहिणी सालियन

साध्वी प्रज्ञासिंह यांनी असे विधान निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केलेले नाही, तर यापूर्वीही अनेकदा जाहीरपणे आणि प्रसारमाध्यमांच्या मुलाखतींमध्ये त्यांनी असेच सांगितले आहे. ‘आंधळ्याला दिसत नाही; म्हणून सृष्टी नाही’, असे कधी म्हणता येईल का ?

हिंदु धर्म, देव आणि संत यांचा अवमान करणार्‍या नेत्यांना हिंदूंनी निवडणुकीत मतांच्या माध्यमातून धडा शिकवावा ! – ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते

देशामध्ये अन्य धर्मियांच्या मतांसाठी सर्वच पक्षांतील काही तथाकथित निधर्मी नेते हिंदु धर्म, देव, संत, तसेच हिंदु धर्मातील प्रथा आणि परंपरा यांचा अवमान अन् टिंगलटवाळी करतात.

हिंदु संतांवर खोटे आरोप करणारे स्त्रीमुक्तीवाले आता गप्प का ?

देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील ३५ वर्षीय ‘ज्युनियर कोर्ट असिस्टंट’ असणार्‍या एका महिला कर्मचार्‍याने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांच्यामध्ये आतंकवाद किती मुरलेला आहे, हे यातून दिसते !’ – जयंत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हिंदु आतंकवादाचे षड्यंत्र रचून समस्त हिंदूंचा आणि भारतियांचा अपमान करणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साध्वींविषयी बोलण्याचा काय अधिकार ?

निष्पक्षपाती अन्वेषण करून निर्दोष पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची त्वरित सुटका करा !

बलात्काराच्या कथित आरोपाखाली मागील ६ वर्षांपासून कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधात आरोप सिद्ध झालेले नाहीत. असे असतांना त्यांना जामीनही संमत करण्यात आलेला नाही.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची सुटका झाली नाही, तर देशभरात ठिकठिकाणी सत्याग्रह करू !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना अटक करण्यामागे मोठ्या राजकीय नेत्यांचे षड्यंत्र आहे. व्यक्तीगत स्वार्थ आणि द्वेष यांमुळे ते पूज्यपाद बापूजी यांना बाहेर येऊ देत नाहीत. पूज्यपाद बापूजी यांनी अनेकांना साधनेला लावले आहे.

संभाजी भिडे यांच्यावर कारवाई का केली नाही ? याचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रावर द्या ! – उच्च न्यायालय

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी दाखल एफ्आयआर्मध्ये मुख्य संशयित आरोपी म्हणून संभाजी भिडे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवूनही त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रावर द्या….

पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांच्या समर्थनासाठी १० मार्चला दादर येथे विशाल मौन पदयात्रा !

पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू ! त्यांच्यावरील या अन्यायाचे निष्पक्षपणे अन्वेषण होऊन त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी आणि त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांचे भक्त आणि संस्कृतीरक्षणासाठी कार्यरत असलेल्या विविध संघटना यांच्या वतीने १० मार्च या दिवशी एक अभियान राबवण्यात येणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now