नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. याचा १३ लाख जप करण्याचा संकल्प होता. प्रत्यक्षात १४ लाख ५८ सहस्र जप झाला.

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२४’चे प्रकाशन !

इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धामध्ये संपूर्ण जग ओढले जात आहे. माझ्या सर्व प्रवचनांमधून मी भक्तांना नेहमी सावध करत असतो. आपण सर्वांनीच सतर्क रहाण्याची वेळ आहे.

सनातन संस्था सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्‍यांचे आभार !

गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्‍यांचे सनातनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. 

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन !

हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.

चेन्नई येथील शिवाचारयार ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. टी. एस्. साम्बमूर्ती कलिदोस यांचा सन्मान !

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणजे १९ जून या दिवशी चेन्नई येथील शिवाचारयार ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. टी. एस्. साम्बमूर्ती कलिदोस यांचा सत्कार करतांना चेन्नई येथील सनातनचे साधक श्री. बाळाजी कोल्ला.

हिंदूंची धर्मावरील श्रद्धा वाढवण्यासाठी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची आवश्यकता !

भारतियांमधील धर्माविषयी श्रद्धा अल्प होत चालली आहे. आता आपल्याला ही श्रद्धा जागृत करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी अशा अधिवेशनांची फार आवश्यकता आहे. असे काम प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे.

सर्व समविचारी संघटनांनी एकत्र येऊन कार्य करावे !

हिंदुजागृतीचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय पावले उचलू शकतो, याचाही निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत योग्य आहे. या अधिवेशनाने नि:संशय उत्तरोत्तर प्रगती करावी, यासाठी आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करूया.

अमरावतीमधील ९ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू होणार !

मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. यासाठी आम्ही श्री महाकाली शक्तीपीठ याठिकाणी आजपासूनच फलक लावत आहोत. अमरावती जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्येही आम्ही असा फलक लावणार आहोत – पू. शक्तीमहाराज

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदुत्वाचा गजर !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंडपणे कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातून ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

गोवा येथे होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज आणि इतर संतांचे आशीर्वाद !

सर्व संतांनी हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठीच्‍या कार्यास आशीर्वाद देऊन पाठिंबा दिला. या वेळी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज यांनी ‘या महोत्‍सवाला मी येण्‍याचा प्रयत्न करीन’, असे सांगितले.