कृष्णाला सखा मानून त्याच्याशी संवाद साधतांना साधिकेला सुचलेली भावपुष्पे !
मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर बसून त्याच्याकडे पहात असतांना मला वाटते, ‘सगळे काही तिथेच थांबले आहे.’ त्या वेळी मला कृष्णाविषयी एक वेगळेच प्रेम जाणवते. मला ते शब्दांत वर्णन करता येत नाही. माझ्या मनात त्याच्याविषयी एक प्रकारची ओढ निर्माण होते आणि मला काव्य किंवा लिखाण सुचते.