हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता ! – पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे महाराज)

हिंदु राष्ट्राचे कार्य काळाची आवश्यकता असून त्याला यश प्राप्त होईल. हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता असून यापुढील काळात हे कार्य वृद्धींगत होईल.

गोवा : वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटुंबासहित श्री लईराईदेवीचे दर्शन घेतले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी शिरगाव येथील श्री लईराईदेवीचे दर्शन घेऊन तिच्या चरणी प्रार्थना करून दिनक्रमाला प्रारंभ केला.

पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात रूपांतर करून सकारात्मक पालट घडवूया ! – आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात

भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.

पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !

केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.

‘पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’ माध्यमातून सर्वांनी पर्यावरणजागृतीसाठी कृतीशील व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकाचालकांचा पोलिसांकडून गौरव

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान गेल्या १२ वर्षांपासून अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका सेवा देत आहे. संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका असून महाराष्ट्राच्या हद्दीतील विविध महामार्गावर अविरत सेवा बजावीत आहे. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.

विनामूल्य मिळणार्‍या पंचतत्त्वाची जपणूक करा ! – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

नाणीज क्षेत्री २ दिवस संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांची जयंती असा संयुक्त सोहळा झाला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ !

प्रयागराज येथील माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

धर्मशास्त्र सांगण्यात माध्यमांमध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’अग्रगण्य ! – अधिवक्ता सचिन रेमणे

‘कि न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने’, या उक्तीनुसार ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र कार्यरत आहे. वाचकांनी आम्हाला पाठवलेले अभिप्राय हे त्यांचा ‘सनातन प्रभात’वर असलेल्या दृढ विश्‍वासाची पोचपावतीच आहे !

३८ सहस्र ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात प्रत्येक हिंदूच्या घरात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचा संकल्प करूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदु धर्माची सध्याची स्थिती काय आहे ? हिंदु समाजावर सध्या कोणत्या प्रकारची संकटे आहेत ? ते हिंदूंना कळले पाहिजे, यासाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ पोचले पाहिजे.