Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला साधू-संतांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘पू. भैयादासजी महाराज यांचे प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या क्षेत्रात अन्नछत्र होते. एके दिवशी पू. भैयादासजी महाराज सनातन संस्थेने लावलेले ग्रंथप्रदर्शन पाहायला आले असता त्यांनी प्रदर्शन पाहून ‘मला फार आनंद झाला’, असे सांगितले.

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला !’

संतांनी जगण्याचे मर्म सांगितले. जे सत्याचा अंत पाहतात, ते खरे संत आहेत.असे केल्यास डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून सेवेची अमूल्य संधी देऊन त्या माध्यमातून साधना करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१२ जानेवारी २०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आवृत्तीची सेवा करणार्‍या साधिका सौ. स्नेहल संतोष गांधी यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता येथे देत आहोत.

वीर सावरकरांचा अवमान केल्याच्या विरोधात धुळे आणि जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन

भोपाळ येथे नुकतेच आयोजित केलेल्या काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात ‘वीर सावरकर-कितने ‘वीर’ ?’ या नावाने एक पुस्तक वाटण्यात आले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करण्यात आली आहे.

पुणे येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक नारायण (नाना) गोडसे यांचे निधन

येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि गोवा मुक्तीसंग्रामात भाग घेऊन शिक्षा भोगलेले स्वातंत्र्यसैनिक नारायण उपाख्य नाना गोपाळराव गोडसे (वय ८५ वर्षे) यांचे ८ जानेवारीला वृद्धापकाळाने निधन झाले. अर्धांगवायूच्या त्रासाने ते गेली ४ वर्षे आजारी होते.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक :  ११ डिसेंबर २०१९
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० डिसेंबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !