महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे विविध संत-महंतांना निमंत्रण

३१ जानेवारी या दिवशी अधिवेशनाचे आयोजन

श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, अंबिकापूर-कोडण्यपूर (महाराष्ट्र) पीठाधिश्‍वर श्रीमद् जगद्गरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्‍वर माऊली सरकार (डावीकडे) यांना हिंदु राष्ट्र अधिवेशनाचेे निमंत्रण देतांना (उजवीकडून) हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातनचे संत पू. प्रदीप खेमका, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. सुनील घनवट

प्रयागराज – येथील महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ जानेवारी या दिवशी हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक, तसेच उत्तराखंडाचे समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके यांनी महाकुंभक्षेत्री असलेले विविध आखाड्यांचे प्रमुख, तसेच अन्य संत-महंत यांच्या भेटी घेऊन त्यांना हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले.

आखाड्याच्या काही संत-महंतांच्या घेतलेल्या भेटी

१. महंत कृष्णगिरी महाराज, जुना आखाडा

२. श्री महंत मुक्तानंद बारजी महाराज, श्री शंभूपंच अग्नी आखाडा

३. पंचायती आखाडा निर्मलचे श्री महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज

४. महंत भोलेस्वरूप महाराज, नर्मदा तट

५. पू. संपूर्णानंद ब्रह्मचारी

६. महंत श्री बाबा मस्तनाथ मठ के महंत तथा बाबा मस्तनाथ विश्‍वविद्यालयाचे कुलपती महंत बालकनाथ योगी

७. श्री श्री श्री विद्याधाम पीठाधीश महंत श्री विभूषित क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ महामंडलेश्‍वर श्री चिन्मयानंद सरस्वती महाराज

८. श्री अंकितजी महाराज, अद्वैश आखाडा, राजकोट

९. आचार्य शिवाकांत दुबे, अमरावती

१०.पू. जनार्दन महाराज

११. श्रीमद् जगद्गुरु अनंतानंदाचार्य स्वामी डॉ. रामकमलदास वेदांती

१२. पंचायती आखाडा नवीन उदासीन निर्माण श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी सुरेशमुनी महाराज

१३. पंचायती आखाडा बडा उदासीन श्री श्री १००८ धर्मप्रकाश महाराज,

१४. श्रीमद् जगद्गुरु रामानंदचार्य स्वामी राजेश्‍वर माऊली सरकार

प्रसिद्धकथावाचक देवकीनंदन ठाकूर महाराज यांना संत संमेलनाचे निमंत्रण !

प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर महाराज यांना (मध्यभागी) हिंदु राष्ट्र अधिवेशनाचेे निमंत्रण देऊन त्यांच्याशी संवाद साधतांना (डावीकडून) पू. प्रदीप खेमका, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, प्रसिद्धी कथावाचक देवकीनंदन ठाकूर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. सुनील घनवट

प्रसिद्धकथावाचक देवकीनंदन ठाकूर महाराज यांना हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातनचे धर्मप्रचारक पू. प्रदीप खेमका, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.