Allahabad HC Urges Media : श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणात चुकीचे वार्तांकन करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह यांच्यातील खटल्याची सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना वार्तांकन करण्यावरून चेतावणी दिली आहे. ‘न्यायालयीन कामकाजाचे दायित्वशून्यतेने किंवा कोणत्याही प्रकारचे चुकीचे अहवाल देणे, हा न्यायालयाचा अवमान आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.