पू. चपळगावकर यांच्यामुळे सनातनच्या साधकांमध्ये धैर्य निर्माण झाले ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘पू. कुलकर्णीकाका यांना ‘अधिवक्त्यांचे आणि हिंदूंचे संघटन व्हावे’, अशी तळमळ असते. त्यांना सुट्टी असेल, तेव्हा ते लगेचच फोन करून ‘कोणत्या जिल्ह्यात जाऊ’, असे विचारतात.

आतंकवाद्यांना ‘अजहरजी’ आणि ‘ओसामाजी’ संबोधणार्‍या काँग्रेसशी सनातन संस्थेचा संबंध जोडणे, हा राजकीय दुष्प्रचार ! – सनातन संस्था

निवडणुकांच्या राजकीय चिखलात हिंदु धर्माचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेला ओढण्याचा काहींचा हेतुपुरस्सर प्रयत्न चालू झाला आहे. सनातन संस्थेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसणारे भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर यांना लक्ष्य करतांना सनातन संस्थेचा वापर करण्यात आला.

भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी संग्रहालय संस्कृती विकसित होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

भारतीय संस्कृती ही मानवी जीवन आणि प्रकृती यांच्यातील दोष दूर करून विकसित झालेली आहे. ही संंस्कृती प्रथम सिंधू, सरस्वती, गंगा आदी नद्यांच्या तटांवर विकसित झाली आणि नंतर पसरली.

अयोध्या येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष भेटी आणि बैठका यांद्वारे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या संपर्कात आलेल्या अयोध्येतील धर्मप्रेमी व्यक्तींशी ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर संवाद साधण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने या भागात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले.

सोप्या भाषेत धर्मशिक्षण देणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे !  श्री. रमाकांत गोस्वामी, वृंदावन

सनातन संस्था आजच्या काळात भाविकांना सनातन धर्माचे शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. सोप्या भाषेत धर्मशिक्षण देणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. यासाठी संस्थेने कुंभक्षेत्री धर्मशिक्षण प्रदर्शन लावले आहे.

समष्टीच्या कल्याणाचा विचार करून चालू असलेले सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य ! – महंत मुक्तानंद ब्रह्मचारी, काशी, उत्तरप्रदेश

शंकराचार्यांनी चालू केलेल्या या कुंभमेळ्याच्या माध्यमातून धार्मिक कार्यासमवेत हिंदूंचे सामाजिक संघटनही व्हायला हवे. आपल्या धर्मध्वजाने सहस्त्रो वर्षे सर्वांना संघटित ठेवले आहे.

काश्मीरप्रमाणे देशात ‘इस्लामिक स्टेट’ येण्यापूर्वी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – चेतन राजहंस

वर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यामध्ये ‘रलिव्ह’, ‘चलिव्ह’ आणि ‘गलिव्ह’, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. याचा अर्थ ‘इस्लाम स्वीकारा, काश्मीर सोडा अथवा मृत्यूला सामोरे जा’, असा होतो.

मौनी अमावास्येच्या पूर्वरात्रीला कुंभक्षेत्रातील पदभ्रमंती !

मौनी अमावास्या ही तिथी म्हणजे मुख्य कुंभपर्वणी ! या दिवशी अनुमाने ३ कोटी भाविक स्नान करणार असल्याने कुंभमेळ्यात भाविकांची खरी गर्दी याच दिवशी आणि पूर्वरात्री होणार होती.

स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागल्याने अनर्थ होत आहे ! – आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज

सध्या स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागले आहे. यामुळेच अनेक अनर्थ होऊ लागले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी ही वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, असे प्रतिपादन सातारा येथील तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्‍वर मठाचे श्री.ष.ब्र.प्र.१०८ आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज यांनी येथे केले.

कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कुंभमेळ्याचे शास्त्र सांगून अध्यात्मप्रसार

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रयागराज येथे पहिल्या राजयोगी स्नानाच्या वेळी कुंभमेळ्याचे महत्त्व आणि शास्त्र फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून समिती अन् संस्थेच्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला उपस्थित साधू-संत तथा भाविक यांनी प्रतिसाद दिला.


Multi Language |Offline reading | PDF