दत्तजयंतीनिमित्त ‘श्री शिवगिरी’ संप्रदायाच्या दत्त पालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आगमन !
पालखीच्या अग्रस्थानी धर्मदंड हातात घेतलेले भक्त होते. आश्रमात पालखीचे आगमन झाल्यावर धर्मदंड घेतलेल्या भक्तांच्या पायांवर जल अर्पण करण्यात आले आणि धर्मदंडाला कुंकू लावून त्याचे पूजन करण्यात आले, तसेच कलशपूजन करण्यात आले.