हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘शिवशक्ती महायज्ञ’ पार पडला !
हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने पारंपरिक शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील एक कार्यक्रम म्हणून बलशाली हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी २७ एप्रिल या दिवशी कृष्णामाई घाट, प्रीतीसंगम या ठिकाणी ‘शिवशक्ती महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते.