नवी मुंबई – इंस्टाग्रामवर औरंगजेबाची स्तुती करणारे स्टेटस ठेवणार्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रफिक कुरेशी असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी बजरंग दलाचे नवी मुंबई जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.
‘आरोपीवर कारवाई करून त्याच्याकडून लेखी किंवा व्हिडिओ द्वारे माफीनामा बनवून घेण्यात यावा’, अशी मागणीही बजरंग दलाने केली आहे. ‘यापुढे असे कृत्य करणार्यांना बजरंग दलाच्या पद्धतीनुसार समज दिली जाईल’, अशी चेतावणी पाटील यांनी दिली आहे.