
मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी आराखडा सिद्ध केला जाईल, तसेच अर्थसंकल्पात त्याविषयी निधीचे प्रावधान करून महाराष्ट्रातील शाळा बळकट केल्या जातील, अशी माहिती मंत्री पंकज भुईर यांनी २४ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली. सदस्य सुभाष देशमुख यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य रोहित पवार, अमित देशमुख यांनी भाग घेतला. मंत्री पंकज भुईर म्हणाले की, सीमावर्ती भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची दुरुस्ती करण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीमधील निधी घेऊन शाळांच्या दुरुस्तीसाठी वापरता येईल. राज्यातील शाळांमध्ये शौचालये नसतील, तेथे शौचालये बांधली जातील.