मंत्रोच्चाराच्या घोषात कोथरूडमध्ये ३ दिवसांच्या भव्य ‘नऊ कुंडीय दत्तयागा’ला आजपासून उत्साहात प्रारंभ !
भगवान दत्तात्रेयांची अमोघ कृपा, पितृदोषांतून मुक्ती आणि नवविधा भक्तीचे परम पावन प्रतीक मानला जाणारा ‘नऊ कुंडीय दत्तयाग’ हा आध्यात्मिक विश्वातील अत्यंत दुर्मिळ अन् कल्याणकारी सोहळा मानला जातो. हिंदु धर्माचा प्रसार होण्यासह जनकल्याणार्थ उद्देशाने यागाचे आयोजन करण्यात आले आहे.