महापालिकेच्या महिला कर्मचार्‍यास अटक !

मालेगावमधील बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचे प्रकरण

मालेगाव – येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या प्रकरणी पोलिसांनी महापालिकेच्या महिला कर्मचारी गजाला परवीन हिला अटक केली. ४ दिवसांपूर्वी महापालिकेचा लिपिक अब्दुल तव्वाफ शेख याला अटक करण्यात आली होती. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! –  संपादक) पोलिसांनी ७ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने २ दिवसांची कोठडी सुनावली. गजालाला ३ महिन्यांची मुलगी असल्याने तिच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

बनावट मृत्यू प्रमाणपत्र सिद्ध करणार्‍या २ संशयितांचा जामीन न्यायालयाने संमत केला. महंमद सुफियान महंमद दस्तगीर याने जिवंत असतांना स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र सिद्ध केले आहे. पोलिसांनी सुफियान आणि त्याला साहाय्य करणारा दलाल मन्सुर अहमद सिराज अहमद यांना अटक केली होती. २२ मार्चला न्यायालयाने दोघांचा जामीन संमत केला आहे.