
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – नागपूर येथे हिंदु समाजाने कुराणातील आयते जाळले, अशी खोटी अफवा पसरवून हिंसा घडवण्यात आली. ही हिंसा घडवणार्या जिहाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ?- संपादक) निवेदनामध्ये म्हटले आहे, १७ मार्चच्या रात्री बजरंग दलातील कार्यकर्त्यांच्या घरांवरही आक्रमण करण्यात आले. अनेक हिंदूंच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. औरंगजेबाच्या कबरीसाठी देण्यात येणारा शासकीय खर्च आता बंद करून ही कबर हटवून त्या जागेवर औरंगजेबाला पराभूत करणार्या शूरवीर धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे, तसेच छत्रपती राजाराम महाराज यांचे भव्य स्मारक उभे करावे. हे स्मारक हिंदवी स्वराज्याचे विजय स्मारक (विजयस्तंभ) म्हणून ओळखले जाईल.