उरळीकांचन (पुणे) येथे महिलेचा विनयभंग करणार्‍याला २४ घंट्यांत अटक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ मार्च या दिवशी अजय भोसले याने लोणी काळभोर येथे दुपारी ४ वाजता पीडित महिलेचा हात धरला, तिचा विनयभंग केला. पीडितेने आरोपीला नकार देत ढकलून दिले. यामुळे आरोपीने पीडितेला शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे यांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आणि २४ घंट्यांत आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले. न्यायालयाने आरोपीला कोठडी सुनावली आहे.