Jaipur Tejaji Temple Vandalism : जयपूर (राजस्थान) येथे वीर तेजाजी मंदिरातील मूर्तीची तोडफोड

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, अशी अपेक्षा !

Hindu New Year : देहलीतील भाजप सरकार उद्या हिंदु नववर्ष मोठ्या थाटामाटात साजरा करणार ! – कला आणि संस्कृती मंत्री कपिल मिश्रा

देहलीचे नवीन भाजप सरकार उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदु नववर्ष मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे. देहली सरकार हा दिवस राष्ट्रीय सणांप्रमाणे, म्हणजेच स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यांप्र्रमाणे साजरा करणार आहे.

Earthquake in Myanmar : म्यानमार आणि थायलंड येथील भूकंप : १ सहस्रांहून अधिक जणांचा मृत्यू

या भूकंपामुळे ३० लाख नागरिक विस्थापित झाले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. भारताने दोन्ही देशांमध्ये साहाय्य म्हणून साहित्य पाठवणे चालू केले आहे.

Hinduphobic Course In Houston University : अमेरिकेतील ह्यूस्टन विद्यापिठात हिंदु धर्माविषयीच्या अभ्यासक्रमात हिंदु धर्माची अपकीर्ती

विदेशी विद्यापिठात हिंदु धर्माविषयी शिक्षण देण्यात येत असल्याने हिंदूंना आनंद होतो; मात्र प्रत्यक्षात त्यात हिंदु धर्माची अपकीर्ती करण्यात येते. हे पहाता असे अभ्यासक्रम अशा विद्यापिठांनी भारताकडून पडताळून घेण्याचा कायदाच आता भारताने केला पाहिजे !

अन्य संशयितांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देतांना नमूद केलेल्या गोष्टी विचारात घेता अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अन्य संशयितांना उच्च न्यायालयाने दिलेला जामीन देतांना नमूद केलेल्या गोष्टी विचारात घेता अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन संमत करावा, असा युक्तीवाद अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला.

पाटण (सातारा) येथील मुख्य जलवाहिनी फुटल्याने ३ दिवसांत सहस्रो लिटर पाणी वाया !

जलवाहिनी फुटल्यानंतर त्याची दुरुस्ती करायला ३ दिवस का लागतात ? वाया गेलेल्या पाण्याचे दायित्व कुणाचे ?

नवी मुंबईत मालमत्ताकर विभागाकडून करवसुलीची धडक मोहीम

कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेवणार्‍या प्रशासनावर कुणाचा अंकुश नसणे हे दुर्दैवी !

पुणे येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून शारीरिक अत्याचार

पुणे शहरामध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांमधील वारंवारता पहाता पुणे कशामध्ये स्मार्ट होत आहे ? हा प्रश्न पडतो. प्रशासनाने यावर कठोर उपाय काढणे आवश्यक !

‘फनेल झोन’च्या निर्णयातून फडणवीस सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला ! – प्रवीण दरेकर

‘फनेल झोन’मधील उंचीच्या निर्बंधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

गुन्हेगारांसह त्यांच्या कुटुंबियांनाही शिक्षा करा !

‘मुलांवर त्यांच्या लहानपणी सात्त्विकतेचे संस्कार केले, तर पुढे मुले गुन्हेगार होण्याची शक्यता अल्प होऊ शकते. याचा विचार करून ‘वयाने लहान असलेल्या गुन्हेगाराच्या कुटुंबियांनाही योग्य ती शिक्षा करण्याचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे; कारण धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्मफलन्यायानुसार पालकांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात.’