Jaipur Tejaji Temple Vandalism : जयपूर (राजस्थान) येथे वीर तेजाजी मंदिरातील मूर्तीची तोडफोड

भाविकांकडून रस्ता बंद आंदोलन

जयपूर (राजस्थान) – येथील प्रतापनगरमधील वीर तेजाजी मंदिरातील मूर्तीची रात्री अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांसह भाविकांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. ‘धार्मिक भावना दुखावण्याच्या सुनियोजित कटाचा भाग म्हणून ही घटना घडली आहे. त्यामुळे यावर कठोर कारवाई करावी’, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

जोपर्यंत दोषींना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, अशी चेतावणी स्थानिक नागरिकांनी दिली आहे. पोलीस घटनेचे अन्वेषण करत आहेत.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, अशी अपेक्षा !