मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदािधकारी !

पुणे – भूतान देशाची नागरिक असलेल्या २७ वर्षीय तरुणीवर ७ जणांनी शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामधील मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यासह मित्रांना अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, अधिवक्ता विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. (छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार होणे पोलिसांना लज्जास्पद ! अशा वासनांधांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही ! – संपादक)
मूळची भूतानची पीडित तरुणी वर्ष २०२० मध्ये बोधगया येथे आली होती. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने ती पुण्यात आली. तेव्हा तिची ओळख ऋषिकेश याच्याशी झाली. त्याने मुख्य आरोपी शंतनु कुकडे याच्याशी ओळख करून दिली. शंतनु हा एक सामाजिक संस्था चालवत होता. त्याच संस्थेत पीडित तरुणीस रहाण्यासाठी जागा आणि शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले. याचा अपलाभ घेत शंतनु याने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर शंतनुचे मित्रही तिच्यावर अत्याचार करू लागले. या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनेक वेळा पीडितेवर शारीरिक अत्याचार केले. कुकडेवर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर पीडितेने समोर येऊन तक्रार प्रविष्ट केली.