आळंदी (जिल्हा पुणे) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून १९ जून २०२५ या दिवशी श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर रात्री विलंबाने हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे. या संदर्भात नियोजनपूर्व आढावा बैठक पंढरपूर येथे झाली. या बैठकीत पालखी सोहळा दिंडी समाज मान्यवर दिंडीकरी, फडकरी, पालखी सोहळा प्रमुख, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. यावर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशी ६ जुलै या दिवशी साजरी होणार असून पालखी सोहळ्याची पत्रिका लवकरच ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’च्या वतीने घोषित करण्यात येईल, असे ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’चे मुख्य व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.