Earthquake in Myanmar : म्यानमार आणि थायलंड येथील भूकंप : १ सहस्रांहून अधिक जणांचा मृत्यू

मंडाले (म्यानमार) – म्यानमार आणि थायलंड या देशांना २८ मार्च या दिवशी बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर १ सहस्र ७०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. या भूकंपामुळे ३० लाख नागरिक विस्थापित झाले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. भारताने दोन्ही देशांमध्ये साहाय्य म्हणून साहित्य पाठवणे चालू केले आहे.

भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंड येथे अनेक इमारती कोसळल्या आणि घरे उद्ध्वस्त झाली. शेकडो लोक ढिगार्‍याखाली अडकले असून ठिकठिकाणी साहाय्यता कार्य चालू चालू आहे. दुभंगलेले रस्ते, महामार्ग, कोसळलेले पूल असे चित्र भूकंपग्रस्त भागांत दिसत आहे.