कोल्हापूर – महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रसह अनेक राज्यांतील भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री जोतिबादेवाच्या ११ ते १४ एप्रिल या यात्रेच्या कालावधीत कोल्हापूर विभागाच्या वतीने १५० अधिकच्या एस्.टी. बसचे नियोजन केले असून सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे विभागांच्या वतीनेही अधिकच्या गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मध्यवर्ती बसस्थानक, पंचगंगा बसस्थानक, जोतिबा बसस्थानक, जोतिबा डोंगर येथून प्रत्येकी ५ मिनिटांस बस सोडण्याचे नियोजन आहे, अशी माहिती कोल्हापूर विभाग नियंत्रकांनी दिली आहे.
यात्रेसाठी तात्पुरत्या ‘यात्रा शेड’ उभारण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मार्गस्थ गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी, तसेच अत्यावश्यक साहित्य उपलब्ध केले आहे. तरी अधिकाधिक भाविकांनी एस्.टी.चा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.