SINDHUDURG BreakingNews : गिर्ये, रामेश्‍वर (सिंधुदुर्ग) आंबा संशोधन केंद्रात १० वर्षांत संशोधनच नाही; मात्र वेतनावर ५ कोटी खर्च !

गिर्ये, रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राकडून या संदर्भात कोणतेही दिशादर्शन मिळत नाही. उत्‍पादकांच्‍या मूलभूत समस्‍या सोडवण्‍याऐवजी या आंबा संशोधन केंद्रातून ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती केली जात आहे, हा काय प्रकार आहे ?

हिंदु विधीज्ञ परिषदेच्‍या पत्रानंतर महाराष्‍ट्र पुरातत्‍व विभागाने स्‍वत:चे संकेतस्‍थळ चालू केले !

महाराष्‍ट्रात माहिती अधिकार कायदा लागू झाला; मात्र त्‍यानंतर स्‍वत:ची माहिती प्रसारित करणे तर दूरच, महाराष्‍ट्र राज्‍य पुरातत्‍व विभागाने स्‍वत:चे संकेतस्‍थळही चालू केले नव्‍हते.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा हिंदु धर्मकार्यातील योगदानासाठी सत्कार !

समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने राजगडावर तिथीनुसार २० जून या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. १९ आणि २० जून असा २ दिवस हा कार्यक्रम होता.

नळदुर्ग (धाराशिव) येथील ‘अफसान यंत्रमाग गारमेंट’ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज !

प्रत्येक संचालकाची स्वमालमत्ता तारण ठेवणे आणि संस्थेचा त्रैमासिक प्रगती अहवाल घेणे या दोन्ही अटी अपूर्ण ठेवल्याने शासनाची भागभांडवलापोटी गुंतवलेली आणि कर्जापोटी दिलेली रक्कम बुडीत जाईल, अशी विदारक स्थिती आहे !

संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांना जामीन मिळण्यासाठी आवेदन सादर करण्यात आले असून त्या संदर्भात अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी युक्तीवाद केला.

अन्वेषणातील नवीन गोष्टी हा जामीन रहित होण्याचा निकष असू शकत नाही हे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘सरकारी पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित करण्यासाठी केलेले आवेदन न्यायाधिशांनी नाकारावे’, असा युक्तीवाद मुंबई येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला.

Dabholkar Murder Case Verdict : डॉ. तावडे सूत्रधार असल्याचा आरोप न्यायलयाने फेटाळला ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

दोषी आरोपींच्या निकालाच्या विरोधात न्यायालयात आव्हान देऊ ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठीच्या आवेदनावर युक्तीवाद चालू

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील एक संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन अर्ज रहित होण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने आवेदन सादर करण्यात आले आहे.

विशेष सरकारी अधिवक्त्यांना वेळ नाही म्हणून खटला लांबवू नये, तसेच जामीन अर्जावरच्या सुनावण्या प्रलंबित राहू नयेत !

अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायालयाला सांगितले, ‘‘या प्रकरणात ३-३ सरकारी अधिवक्ते असतांनाही विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर जाणीवपूर्वक खटल्यांच्या दिनांकांना अनुपस्थित राहून खटला लांबवत आहेत, याची न्यायाधिशांनी नोंद घ्यावी.

वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदु विधीज्ञ परिषद

वैचारिक आतंकवाद हा भयंकर असून तो देशाच्या अर्थव्यवस्थेसह आपली संस्कृती आणि स्वाभिमान यांना उद्ध्वस्त करतो. या आतंकवादाला कुठला रंग नाही. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे…