‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी ‘बजरंगी पहारा पथका’च्या माध्यमातून युवा पिढीचे समुपदेशन ! – आकाश जाधव, बजरंग दल

येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, रमा उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, तसेच सांगलीकर मळा परिसरात बजरंग दलाच्या वतीने १४ फेब्रुवारी या दिवशी ‘बजरंगी पहारा पथका’च्या माध्यमातून हिंदु युवक आणि युवती यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या कुप्रथेपासून परावृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखा ! – बजरंग दल आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखावेत, या मागणीसाठी बजरंग दल आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मिरज येथे तहसीलदार श्री. संजय इंगळे यांना निवेदन देण्यात आले.