त्र्यंबकेश्वर देवस्थानाला वर्ग ‘अ’ दर्जा घोषित !

विभागीय आयुक्तांकडून याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यामुळे येथील देवस्थानाच्या विकास आराखड्याला गती मिळणार असून भाविकांनाही सोयीसुविधा उपलब्ध होतील.

राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यांत २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान जमा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

या कार्याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य गोसेवा आयोगाचे अभिनंदन केले. देशी गोवंश संवर्धन ही काळाची आवश्यकता असून देशी गोवंशियाच्या संवर्धनामुळे ग्रामीण विभागाचा विकास गतीमान होण्यास साहाय्य होणार आहे.

३ वर्षांच्या मुलीची हत्या करून धर्मांधाने मृतदेह बॅगेत लपवला !

धर्मांधाचे क्रौर्य ! अशांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा द्यायला हवी !

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणार्‍या पतीला अटक !

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या करून पत्नीचा मृतदेह विद्युत् मोटारीच्या लोखंडी बॉक्समध्ये लपवून ठेवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मंगेश कांबळे याला अटक केली. सांगली जिल्ह्यातील मांगले येथे ही घटना घडली.

औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

औरंगजेबाने शंभूराजेंचे हाल-हाल केले, छळ केला, यात त्याची क्रूरता आपल्याला दिसली, तर शंभूराजांचे शौर्यही आपण पाहिले आहे. औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, जी भावना जनतेची आहे, तीच आमची भावना आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Sadhvi Pragya Singh : मालेगाव येथे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्यानिमित्त विराट हिंदु संत संमेलन !

भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त ३० मार्च या दिवशी होणार्‍या विराट हिंदु संत संमेलनाला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अनुमती दिली आहे; मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता उच्च न्यायालयाने काही अटीसुद्धा घातल्या आहेत.

Kondhwa Center For Jihadists : पुण्यातील कोंढवा भागात झळकला सौदी अरेबियाचा झेंडा !

या घटनेची सत्यता पडताळून पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करत त्यांना सौदी अरेबियात हाकलले पाहिजे !

Malda Hindus Attacked : मालदा (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण

बंगालमध्ये भाजपने अशा प्रकारची मागणी करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारला राज्यातील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यास सांगितले पाहिजे, तरच हिंदूंचे आणि देशाचेही रक्षण होईल !

Sukma Naxal Encounter : सुकमा (छत्तीसगड) येथे चकमकीत १६ नक्षलवादी ठार

सुकमा येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले, तर २ सैनिक घायाळ झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

PM Modi Nagpur Visit : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संघसंचालित माधव नेत्रालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन !

संघाच्या स्मृतीमंदिरासह दीक्षाभूमीला भेट देणार
नेत्रालयाच्या भूमीपूजन सोहळ्यात सहभागी होणार