हिंदु संघटनांच्या विरोधातील न्यायालयीन प्रकरणे आणि त्यामागील षड्यंत्र !

कार्य उभारणीसाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि हे कार्य थांबावे म्हणून षड्यंत्रकारी देशी-विदेशी शक्तींनी सनातन संस्थेवर केलेले आघात थांबवण्यासाठी किंवा त्याचा परिणाम म्हणून भोगावे लागणारे कष्ट यांत पुष्कळ मोठे अंतर आहे !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित !

आतंकवादविरोधी पथकाने डॉ. तावडे यांना कह्यात घेऊन त्यांची पुढील रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात केली. ‘या प्रकरणी लवकरच आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका (अपील) करू’, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकारांना सांगितले.

संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांना जामीन मिळण्यासाठी आवेदन सादर करण्यात आले असून त्या संदर्भात अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी युक्तीवाद केला.

अन्वेषणातील नवीन गोष्टी हा जामीन रहित होण्याचा निकष असू शकत नाही हे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘सरकारी पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित करण्यासाठी केलेले आवेदन न्यायाधिशांनी नाकारावे’, असा युक्तीवाद मुंबई येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित करा ! – हर्षद निंबाळकर, विशेष सरकारी अधिवक्ता

सरकार पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठी जिल्हा न्यायालयात आवेदन प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहे. त्यावर सरकारी वकिलांचा युक्तीवाद ९ मे या दिवशी संपला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मे या दिवशी होणार आहे.

सनातन धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना दडपण्याचे कारस्थान ! – डॉ. अमित थढाणी

अंनिसच्या आर्थिक व्यवहारांत मोठा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. डॉ. दाभोलकर यांनी कायद्याचे उल्लंघन करून विदेशातून लाखो रुपयांच्या देणग्या मिळवल्या.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठीच्या आवेदनावर युक्तीवाद चालू

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील एक संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन अर्ज रहित होण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने आवेदन सादर करण्यात आले आहे.

विशेष सरकारी अधिवक्त्यांना वेळ नाही म्हणून खटला लांबवू नये, तसेच जामीन अर्जावरच्या सुनावण्या प्रलंबित राहू नयेत !

अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायालयाला सांगितले, ‘‘या प्रकरणात ३-३ सरकारी अधिवक्ते असतांनाही विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर जाणीवपूर्वक खटल्यांच्या दिनांकांना अनुपस्थित राहून खटला लांबवत आहेत, याची न्यायाधिशांनी नोंद घ्यावी.

अखिल मानवजातीचे हित साधणे, हाच सनातन संस्थेचा उद्देश !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी संवाद साधून संस्थेचे मत जाणून घेतले आहे. या संवादातून विरोधकांचे षड्यंत्र आणि सनातन संस्थेचा मानवहितकारी उद्देश लक्षात येईल.

पंचनाम्यात खाडाखोड असणे यांसह न्यायालयातील जबाब आणि प्रत्यक्ष पंचनामा यांत अनेक तफावती ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

पंचनाम्यात अनेक नावे अपूर्ण आणि अर्धवट आहेत. पहिल्या पंचनाम्यात पंचांच्या नावाचा उल्लेख नाही. पंचनाम्यासाठी पोलिसांनी कोणती साधनसामुग्री घेतली ते पंचनाम्यात नमूद नाही यांसह अनेक गोष्टी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.