‘फनेल झोन’च्या निर्णयातून फडणवीस सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला ! – प्रवीण दरेकर

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – मुंबईतील फनेल झोनमधील (विमानतळाच्या धावपट्ट्या आणि प्रवेश मार्गांभोवतीचे हवाई क्षेत्रामधील) रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करून फडणवीस सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. स्वयंपुनर्विकास चळवळ पुढे घेऊन जात असतांना सरकारकडून मिळालेले पाठबळ मला स्वयंपुनर्विकास चळवळ पुढे घेऊन जाण्यास नक्कीस प्रोत्साहित करणारे आहे, असे वक्तव्य विधान परिषदेचे गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास मोहिमेचे नेतृत्व करणारे प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

मुंबई येथील सांताक्रूझ, पार्ले आणि कुर्ला या भागांत विमानतळाच्या ‘फनेल झोन’मधील उंचीच्या निर्बंधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. उंचीच्या निबंर्धामुळे जर जागेवर वापरात येणे शक्य नसल्यास तेवढ्या क्षेत्राचा टी.डी.आर्. मालकाला उपलब्ध करून देण्याचा पुरोगामी निर्णय घेण्यात आल्याची घोषणा २६ मार्चला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली होती. यावर प्रतिक्रिया देतांना प्रवीण दरेकर बोलत होते.