२ लाख २३ सहस्र प्रकरणांत ९७ टक्के मुसलमानांचा समावेश !
जळगाव – छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट कागदपत्रांआधारे जन्म दाखला मिळवणार्या आणि त्यासाठी आवेदन केलेल्या ८ संशयित बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. महाराष्ट्रात विधानसभा २०२४ निवडणूक प्रचार आणि आचारसंहिता काळात मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म दाखले दिल्याचे समोर आले आहे. याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आतापर्यंत अशी २ लाख २३ सहस्र प्रकरणे उघडकीस आली आहेत, अशी माहिती भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ८ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. (संबंधित देशविरोधी अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
किरीट सोमय्या म्हणाले की,
१. २ लाख २३ सहस्रांमध्ये ९७ टक्के मुसलमान आहेत. त्यातील ८० टक्के प्रकरणांत पुरावा म्हणून केवळ आधारकार्ड जोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यातील १० जिल्ह्यांत १६ गुन्हे नोंद झाले आहेत. १७ वा गुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे नोंद झाला आहे.
२. महाराष्ट्राच्या १० जिल्ह्यांमध्ये अशा बनावट दाखल्यांचा प्रकार समोर आल्याने केंद्रीय जनगणना संचालकांनीही पत्र देऊन त्याविषयाची माहिती राज्य सरकारकडून मागवली आहे.
३. छत्रपती संभाजीनगर येथील बनावट जन्मनोंदी प्रकरणांत महंमद जमील सिद्दिकी महंमद रशीद, मुजफ्फर अन्वर खान, नबी हबीब शेख, युनूस रफिक शेख, रिझवान खान अन्वर खान पठाण, सादिक हुसेन शेख, शाहेद सज्जाद शेख, मिर्झा अन्वर बेग अशी गुन्हा नोंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.