पुणे येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून शारीरिक अत्याचार

प्रतिकात्मक चित्र

पुणे – दुकानामध्ये निघालेल्या १२ वर्षांच्या मुलीचे दुचाकीवरून अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना वारजे-माळवाडी परिसरातील उत्तमनगर येथील एका लॉजवर (तात्पुरते निवासस्थान) घडली. या प्रकरणी आरोपी राहुल गौतम, अविनाश डोमपल्ले, ‘पिकॉक लॉज’चे मालक भगवान मोरे आणि व्यवस्थापक टिकाराम चपाघई यांच्या विरोधात वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार प्रविष्ट केली होती.

२१ मार्च या दिवशी दुपारी आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लॉजवर नेले. राहुल याने मुलीला ‘तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला मारून टाकेन’, अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या संपूर्ण घटनेमध्ये अविनाश डोमपल्ले याने राहुलला साथ दिली, तसेच पीडितेवर लग्नासाठी दबाव टाकला. पीडिता १० वर्षांची असतांनाही आरोपी राहुल याने यापूर्वी तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

संपादकीय भूमिका :

पुणे शहरामध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांमधील वारंवारता पहाता पुणे कशामध्ये स्मार्ट होत आहे ? हा प्रश्न पडतो. प्रशासनाने यावर कठोर उपाय काढणे आवश्यक !