चिंचवड येथे आयोजित नववर्ष शोभायात्रा उत्साही वातावरणात पार पडली !
हिंदु नववर्षानिमित्त सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. स्थानिक लोकप्रतिनिधीही यात्रेत सहभागी झाले होते.
हिंदु नववर्षानिमित्त सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. स्थानिक लोकप्रतिनिधीही यात्रेत सहभागी झाले होते.
हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात ३० मार्च या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
हिंदु नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थांनी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात नववर्ष स्वागत शोभायात्रा काढल्या होत्या. वाशी येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समिती, वाशी यांच्या वतीने स्वामीनारायण गुरुकुल सेक्टर -२९ येथून शोभायात्रा काढण्यात आली.
सध्या सनातन धर्म, संस्कृती, धर्मग्रंथ, कालगणना, संस्कृत, गोमाता, गंगा, मंदिरे आदी हिंदु धर्माचे मानबिंदू संकटात आहेत. म्हणूनच हिंदूंनो, सनातन धर्मशास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या युगादि तिथीला भारत हिंदु राष्ट्र स्थापित होण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध व्हा !
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदु दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ‘वेदांग ज्योतिष’ या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात.
गुढीपाडवा म्हणजे मांगल्य, नवचैतन्य, उल्हास आणि आनंदाचा दिवस. समस्त हिंदु समाज मग तो श्रीमंत असो वा गरीब, स्वत:च्या घरापुढे नववर्षाची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करतो.
‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल, ती मला मिळू दे. ती शक्ती राष्ट्र आणि धर्म या कार्यासाठी वापरली जाऊ दे’, हीच आपल्याचरणी प्रार्थना !
‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य आणि सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत.