भारत फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करणार !

नवी देहली – भारत सरकारने फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करार करण्याला मान्यता दिली आहे. ६३ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा हा सरकारी करार लवकरच होऊ शकतो. या करारानुसार, भारतीय नौदलाला २२ एक आसनी आणि ४ दोन आसनी विमाने मिळतील. यापूर्वी भारताने वायूदलासाठी फ्रान्सकडून ५९ राफेल लढाऊ विमाने खरेदी केलेली आहेत.