धर्मांतर प्रकरणी भाजपच्या उज्ज्वला गौड यांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळले !

कोथरूड (पुणे) येथे  तरुणीचे बळजोरीने  धर्मांतर केल्याचे प्रकरण !

प्रतीकात्मक चित्र

पुणे – येथील कोथरूड परिसरात सलून चालकाने सलूनमध्ये काम करणार्‍या तरुणीचे बळजोरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी सलून चालकाला आणि त्याच्या साथीदाराला मारहाण केली, तर दुसरीकडे पोलिसांनी भाजपच्या उज्ज्वला गौड यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. यातील तरुणी आणि संबंधित सलूनचालक यांच्यामध्ये आर्थिक वाद होता आणि यामुळेच त्यांच्यात अनेक वेळा वादावादीही झाली होती. या प्रकरणी तरुणीने केलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात सलूनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र काही हिंदुत्वनिष्ठांनी हे प्रकरण घडल्याचे सांगितले आहे.