Wildfire At Chamundi Hills : म्हैसुरू (कर्नाटक) येथील चामुंडी डोंगरावर आग : ३५ एकर जंगल नष्ट !

सहा वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे आग लागून डोंगरावरील जंगल नष्ट झाले होते. वर्ष २०१७ मध्ये चामुंडी डोंगराच्या ललिताद्रपुरा गस्तीच्या परिसरात आग लागून ६ एकर क्षेत्राची हानी झाली होती.

Delhi Earthquake :  देहलीला पहाटे बसले भूकंपाचे धक्के

देहली येथे ४ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र देहलीतच पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केवळ ५ किमी खाली होते.

आपत्कालीन परिस्थितीत चेतावणी देणारे २० वर्षांपूर्वीचे भोंगे कालबाह्य !

स्वयंचलित भोंगा इशारा प्रणाली खरेदी करण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

California Fire : कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील वणव्यात १ सहस्र १०० इमारती जळून खाक !  

आगीमुळे लॉस एंजेलिसमधील ब्रेटनवूड भागातील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांचे घर रिकामे करण्याची सूचना देण्यात आली आहे.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : ९५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये ७ जानेवारीला सकाळी ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये ९५ जणांचा मृत्यू झाला, तर ६२ जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वी नेपाळमध्ये एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये अनुमाने १० सहस्र लोक मृत्यूमुखी पडले होते.

Koyna EarthQuake 2025 : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्‍य धक्‍का !

कोयना धरण परिसरात ५ जानेवारी या दिवशी सकाळी ६.५६ वाजता भूकंपाचा सौम्‍य धक्‍का बसला. त्‍याची तीव्रता २.४ रिश्‍टर स्‍केल एवढी नोंदवली गेली आहे. वर्ष २०२५ च्‍या प्रारंभी राज्‍यात झालेला हा पहिलाच भूकंप आहे.

Cyclone Chido : फ्रान्सच्या मेयोट बेटावर धडकले ‘चिडो’ चक्रीवादळ !

‘चिडो’ चक्रीवादळ कोमोरोस बेटांवरही धडकले आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ मोझांबिकमध्ये धडकले. तिथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडूमध्‍ये भूस्‍खलन : ७ जण बेपत्ता

‘फेंगल’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्‍या तमिळनाडू राज्‍यातील तिरुवन्‍नमलाई येथील एका टेकडीवर भूस्‍खलन झाले.

Cyclone Fengal : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा तमिळनाडूला फटका; मात्र जोर ओसरला !

‘फेंगल’ने तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे चक्रीवादळ हळूहळू पश्‍चिमेकडे सरकेल आणि नंतर त्याची तीव्रता न्यून होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.