राज्यस्तरीय बातम्या

तेजस्वी विचार

गुळाची चव गाढवाला काय ?

‘हिंदु धर्माच्या विरोधात साहित्यिक, बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी बडबडतात. तेव्हा ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, या म्हणीची आठवण येते !’

उथळ विचारांचे अहंकार असलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

‘आंधळ्यांना स्थूल जग दिसत नाही, तसे साधना न करणार्‍यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्म जग दिसत नाही. आंधळा ‘दिसत नाही’, हे मान्य करतो; पण बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म जग असे काही नसते’, असे अहंकाराने म्हणतात !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

दिनविशेष

राष्ट्र-धर्मविषयक चौकट

  • आजच्या काळात संघटित असणे, हीच पुष्कळ मोठी शक्ती आहे !
    ‘हिंदुस्थानातील संपूर्ण हिंदु समाज सारा केव्हा तरी पूर्ण संघटित होईल नि मग हिंदु राष्ट्र स्वतंत्र होईल’, ही खुळी कल्पना आहे. तसे कधीच घडणार नाही; परंतु राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी राष्ट्राची काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत..
  • स्वामी विवेकानंद यांची शिकवण
    जीवात्म्याचे निवासस्थान असलेले, हे शरीर कर्म करण्याचे एक अत्यंत उपयुक्त असे साधन आहे आणि जो माणूस, हे शरीर नरकतुल्य करतो, तो अपराधी आहे, तसेच जो माणूस शरिराची हेळसांड करतो, त्याची उपेक्षा करतो, तोही दोषास पात्र आहे.

साधनाविषयक चौकट

  • नामजपाचे महत्त्व
    ज्या वेळी वाईट विचार मनात येतील, त्या वेळी भगवंताचे नाम घेतले, तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. ‘मी’पणाचे दडपण आपोआप न्यून होत जाईल.
  • स्वामी विवेकानंद यांचे आत्मसंयमाविषयी विचार
    ज्याने आत्मसंयमाचा अभ्यास केलेला आहे, तो बाहेरील कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ शकत नाही, तो कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनत नाही…
  • साधकाचे अहिंसा व्रत
    साधकाने आपल्या साधनेचे एक महत्त्वाचे अंग या दृष्टीनेच अहिंसेकडे पहावे. हे अंगदेखील चोवीस तास सांभाळावे लागते.
  • सेवेच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !
    ‘अभिनेता जेव्हा त्याच्या भूमिकेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याचा अभिनय जिवंत वाटतो. याप्रमाणे साधक जेव्हा मनाने सेवेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याची सेवा परिपूर्ण होते.