इतरांचा विचार करणारी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची कर्णावती (गुजरात) येथील कु. मेहेक पाल (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मेहेक पाल ही या पिढीतील एक आहे !

उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा ३०.३.२०२५) या दिवशी कु. मेहेक राजेश पाल हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. मेहेक राजेश पाल हिला दहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. मेहेक पाल

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. मेहेक राजेश पाल उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घाेषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (५.३.२०२५)


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. ‘कु. मेहेक स्वभावाने शांत आहे. 

२. नीटनेटकेपणा

ती स्वतःचे कपडे, तसेच तिची पुस्तके ठेवलेला खण नीट ठेवते.

सौ. मंदा आष्टीकर

३. प्रेमभाव

कुटुंबियांपैकी कुणी रुग्णाईत असल्यास मेहेक त्यांना लगेच साहाय्य करते. तिच्या आईची प्रकृती ठीक नसल्यास ती आईच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते.

४. इतरांचा विचार करणे

ती तिच्या आईला घरकामात साहाय्य करते, उदा. भाजी चिरणे, भांडी घासणे आणि अन्य लहान सहान कामे करणे.

५. ऐकण्याची वृत्ती 

एकदा तिच्या आईने तिची चूक झाली; म्हणून तिला खेळायला न जाता घरातच बसायला सांगितले. तेव्हा ती ३ घंटे एकाच ठिकाणी बसून राहिली.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव

ती दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून ‘हे डॉ. बाबा आहेत. मला त्यांच्याकडे घेऊन चल’, असे सांगते आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला नमस्कार करते.’

– सौ. मंदा आष्टीकर (कु. मेहेकची आजी (आईची आई)), नवीन पनवेल, जिल्हा रायगड. (१५.४.२०२४)

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.