बांधकामाशी संबंधित कृती भावपूर्ण, परिपूर्ण आणि सेवाभावाने केल्यावर त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने बांधकामाशी संबंधित केलेल्या चाचण्या आणि त्याविषयी केलेले अद्वितीय संशोधन

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची खोली आणि त्या शेजारील खोली यांच्या दाराच्या चौकटी अन् दारे पालटून नवीन बसवण्यात आली. सनातन आश्रमातील बांधकामाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकाने (श्री. वासुदेव गोरल यांनी) ६ ते १४.३.२०२४ या कालावधीत ही सेवा केली.

बांधकामाशी संबंधित कृती करतांना त्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

१. चाचण्यांतील नोंदींचे विवेचन 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची खोली आणि त्या शेजारील खोली यांना नवीन चौकट अन् दार बसवण्यापूर्वी, तसेच बसवल्यावर त्यांची छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या छायाचित्रांत नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

वरील नोंदींवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१ अ. दोन्ही खोल्यांची नवीन दारे आणि त्यांच्या चौकटी यांच्यामध्ये सकारात्मक स्पंदने आहेत.

सौ. मधुरा कर्वे

१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची खोली आणि त्या शेजारील खोली यांना नवीन चौकट बसवण्यापूर्वीही तेथे पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळून येणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अत्युच्च पातळीचे समष्टी संत आहेत. त्यांच्यातील चैतन्यामुळे ते रहात असलेली खोली चैतन्याने भारित झाली आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे पूर्वी त्यांच्या शेजारील खोलीत आश्रम पहायला येणारे समाजातील संत, सनातनचे संत अन् साधक, तसेच प्रतिष्ठित पाहुणे यांना भेटत असत. तसेच त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करत असत.

थोडक्यात तेथे साधना-सत्संग होत असत. त्यामुळे ही खोलीही चैतन्याने भारित झाली आहे. त्यामुळे दोन्ही खोल्यांना नवीन चौकट बसवण्यापूर्वीही तेथे पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळून आली.

१ इ. दोन्ही खोल्यांना नवीन चौकट आणि दार बसवल्यानंतर तेथील सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ होणे : दोन्ही खोल्यांना नवीन दार बसवतांना प्रत्येक टप्प्यावर त्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. याचे कारण हे की, बांधकामाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकाने (श्री. वासुदेव गोरल यांनी) ही सेवा अतिशय नीटनेटकी आणि सेवाभावाने केली आहे. साधकाचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आहे. साधकाने केलेल्या भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवेमुळे त्याने केलेल्या सेवेतून सकारात्मक स्पंदनांची निर्मिती झाली. यातून ‘बांधकामाशी संबंधित कृती भावपूर्ण, परिपूर्ण आणि सेवाभावाने केल्यावर त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात’, हे लक्षात येते.

१ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ज्या खोलीत निवास करतात त्या खोलीच्या दारातून अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे त्यांच्या रहात्या खोलीत अधिक वेळ व्यतित करतात. या खोलीत ते ग्रंथ-लिखाणाची सेवाही करतात. शेजारील खोलीपेक्षा ते निवास करत असलेल्या खोलीत त्यांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) चैतन्यमय स्पंदने अधिक प्रमाणात विद्यमान आहेत. त्यामुळे ते निवास करत असलेल्या खोलीच्या दारातून अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. यातून ‘संतांमधील चैतन्यामुळे त्यांची वास्तूही कशी चैतन्यमय बनते’, हे लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.२.२०२५)