तन आणि मन अर्पण करण्याचे महत्त्व ! 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधकांनो, ‘तन, मन आणि धन यांपैकी तन आणि मन अर्पण करणे, हे सर्वांत श्रेष्ठ असते. केवळ धन अर्पण केल्याने अध्यात्मात प्रगती होत नाही. ‘मनाने अखंड नामजप होत आहे. स्वभावदोष निर्मूलन होत आहे. आपली भावजागृती होत आहे’, यामुळे मन अर्पण होते. शरिराने सेवा केल्यास देहबुद्धी नष्ट होते, म्हणजे अहं न्यून होतो. त्यामुळे मनुष्याची अध्यात्मात प्रगती जलद होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले