
दुबई – संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख महंमद बिन झायेद अल् नाह्यान यांनी रमझानच्या पवित्र महिन्यात बंदीवानांना सामूहिक सुटका करण्याची घोषणा केली आहे. यांमध्ये विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेल्या ५०० भारतियांचाही समावेश आहे. या बंदीवानांना तेथील कारागृहांतून सोडण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शेख झायेद यांच्या आदेशानुसार १ सहस्र २९५ बंदीवानांना सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी पंतप्रधान शेख महंमद बिन रशीद अल् मकतूम यांच्या आदेशानुसार १ सहस्र ५१८ बंदीवानांनाही सोडण्यात आले.
🇦🇪🤝🇮🇳 Big Relief for Indian Prisoners in UAE!
Ahead of Ramadan, 500+ Indians set to be released from UAE prisons, showcasing the strong India-UAE ties and UAE’s broader approach to justice & diplomacy. 🌍#IndiaUAE #Ramzanpic.twitter.com/4fmyfGmSlc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2025
१. संयुक्त अरब अमिरात सरकार प्रतिवर्षी रमझान महिन्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी नसलेल्या शेकडो बंदीवानांची सुटका करते. यांमध्ये मोठ्या संख्येने भारतियांचाही समावेश असतो.
२. या सुटकेचा उद्देश या बंदीवानांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडणे आणि त्यांना समाजात परत आणणे हा आहे, असे सांगण्यात आले आहे.
३. दुबईचे ॲटर्नी जनरल चान्सलर इस्साम इस्सा अल् हुमैदान यांनी सांगितले की, संयुक्त अरब अमिरातच्या राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयामुळे त्यांची शिक्षा पूर्ण करणार्यांप्रती असलेली वचनबद्धता दिसून येते. बंदीवानांची सुटका केल्यामुळे ते त्यांच्या आयुष्याचा नव्याने आरंभ करू शकतील.
४. दुबई न्यायालयाने पोलिसांच्या साहाय्याने या बंदीवानांना सोडण्याची प्रक्रिया चालू केली आहे. शेख महंमद झायेद यांनी सुटका झालेल्या बंदीवानांचे आर्थिक दायित्वही पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले आहे. सुटका झालेल्या बंदीवानांच्या कुटुंबियांवर कोणताही आर्थिक भार पडू नये, हा यामागचा उद्देश आहे.