कलियुगात केवळ भगवंताच्या नामाने मनुष्याला दर्शन होते !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापरयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते; परंतु कलियुगामध्ये त्यांपैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वत: अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले, ‘साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि १३ कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते.’ सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत; म्हणून संतांनी ‘कळवळून नाम घ्या’, असे सांगितले. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, मी नाम घेतो आहे, हेसुद्धा विसरून जा.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज